बॉलिवूडमधील Most Awaited लग्न अर्थात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं लग्न अलीकडेच पार पडलं. दरम्यान त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. दरम्यान रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी हिने देखील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात रणबीर-आलियाच्या मेहंदी आणि संगीत सेरेमनीपासून ते लग्नापर्यंतचे फोटो आहेत. रिद्धिमाने काही लेटेस्ट आणि Unseen Photos शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य- Instagram @riddhimakapoorsahniofficial)
रिद्धिमा कपूर साहनीने आलिया-रणबीरच्या मेहंदी सोहळ्यातील एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणबीरने आपल्या बहिणीला उचलून घेतले आहे. (फोटो सौजन्य- Instagram @riddhimakapoorsahniofficial)
रिद्धिमाने मुलगी समारा साहनी आणि आलियाची बहीण शाहीन भट्ट यांचाही फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने Dolls असे कॅप्शन दिले आहे. (फोटो सौजन्य- Instagram @riddhimakapoorsahniofficial)
रिद्धिमा कपूर साहनीचा हा फोटो संगीत सेरेमनीमधील आहे. यामध्ये तिने सेक्विन सिग्नेचर साडी परिधान केली आहे. ही साडी मनिष मल्होत्रा याने डिझाइन केली असून रिद्धिमा यात अत्यंत सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य-Insatagram @riddhimakapoorsahniofficial)
या फोटोमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसह करीना कपूर खान, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर आणि घरातील इतर महिला दिसत आहेत. (फोटो सौजन्य- Instagram @riddhimakapoorsahniofficial)
रिद्धिमा कपूरने आलिया भट्ट-रणबीर कपूरचा हा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. यामध्ये रणबीर आलियाला किस करताना दिसत आहे..(फोटो सौजन्य- Instagram @riddhimakapoorsahniofficial)
रिद्धिमा कपूर साहनीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये करिश्मा कपूर आणि करीना कपूर खान देखील आहेत. यामध्ये कपूर सिस्टर्स रॉयल पोज देताना दिसत आहेत (फोटो सौजन्य- Instagram @riddhimakapoorsahniofficial)
या फॅमिली फोटोमध्ये रणबीर कपूर वराच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. तर कपूर कुटुंबीय ट्रेडिशनल अंदाजात दिसत आहेत. (फोटो सौजन्य- Insatagram @riddhimakapoorsahniofficial)
रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नात करीना कपूर खान, करिश्मा कपूरसह आलेल्या पाहुण्यांनी देखील धमाकेदार डान्स केला (फोटो सौजन्य- Insatagram @riddhimakapoorsahniofficial)
रणबीर कपूरचा हा फोटो सर्वाधिक व्हायरल झाला असून, चाहत्यांनी अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत. हा फोटो रणबीर आलियाच्या मेहेंदी सेरेमनीमधील आहे. यामध्ये रणबीरच्या हातात त्याचे वडील दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा फोटो आहे. (फोटो सौजन्य- Instagram @riddhimakapoorsahniofficial)