26 वर्षांपूर्वी दाऊदमुळे सोडलं होतं बॉलिवूड; राज कपूरची 'गंगा' पुन्हा पडद्यावर अवतरणार
राम तेरी गंगा मैली या RK बॅनरच्या पहिल्याच सिनेमाने मंदाकिनी रात्रीत सुपरस्टार झाली. आणखी काही चित्रपट केल्यानंतर आली तशी अचानक गायबही झाली. दाऊद इब्राहिमशी काय होतं नातं? 26 वर्षांनी कमबॅक करणाऱ्या अभिनेत्रीविषयी या गोष्टी माहीत नसतील...
|
1/ 10
कुख्यात गुंड दाऊदबरोबर दिसलेली ही स्टार आठवतेय का? एका रात्रीत स्टारपद मिळवणारी ही अभिनेत्री आहे मंदाकिनी.
2/ 10
तीन दशकांपूर्वी राम तेरी गंगा मैली सिनेमाने हिंदी चित्रपटसृष्टीला नवा बोल्ड चेहरा दिला होता. साक्षात राज कपूर यांनी मंदाकिनी नावाच्या या अभिनेत्रीला लाँच केलं होतं.
3/ 10
राम तेरी गंगा मैली या पहिल्याच सिनेमाने मंदाकिनी रात्रीत सुपरस्टार झाली. त्यानंतर काही सिनेमे केले आणि अचानक बॉलिवूडमधून गायब झाली.
4/ 10
मंदाकिनी हे नाव तिला राज कपूर यांनीच दिलं होतं. तिचं खरं नाव यास्मिन जोसेफ. ब्रिटिश वडील आणि काश्मिरी आईची ही मुलगी बोल्ड होतीच, RK बॅनरने तिला वलय दिलं.
5/ 10
पहिल्याच सिनेमात सेमीन्यूड सीन दिले म्हणून मंदाकिनीवर टीका झाली, पण तिला प्रचंड प्रसिद्धीसुद्धा मिळाली.
6/ 10
राम तेरी गंगा मैलीनंतर मिथुन चक्रवर्ती, गोविंदा आदी नटांबरोबर तिचे काही सिनेमे आले, पण तेवढे हिट झाले नाहीत आणि अचानक ती बॉलिवूडमधून गायब झाली.
7/ 10
कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमबरोबर तिचं नाव जोडलं गेलं. ते दुबईत भेटल्याचे फोटो प्रसिद्ध झाले.
8/ 10
मंदाकिनीने दाऊदला भेटल्याचं नाकारलं नसलं, तरी दाऊदशी संबंध असल्याचं तिने कधीच मान्य केलं नाही.
9/ 10
चित्रपट संन्यास घेतल्यानंतर काही दिवसांनी मंदाकिनीने बौद्ध धर्म स्वीकारला. पूर्वायुष्यात बौद्धभिख्खू असणाऱ्या एका बौद्ध अभ्यासकाशी तिने लग्न केलं, अशी माहिती विकीपीडियावर आहे.
10/ 10
मंदाकिनी तब्बल 26 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.