रक्षाबंधन हा सण प्रत्येकासाठीच खास असतो. भावाच्या हातावर प्रेमाचा आणि मायेचा धागा अर्थातच राखी बांधून हा उत्सव साजरा केला जातो.
सर्वसामान्य लोक असो किंवा सेलिब्रेटी प्रत्येकालाच या सणाची ओढ असते. आपण नेहमीच बॉलिवूड कलाकरांच्या भावंडांना पाहिलं आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला साऊथ सेलेब्रेटींच्या भावंडांबाबत सांगणार आहोत.
साऊथची लोकप्रिय अभिनेत्री समंथा प्रभूला दोन भाऊ आहेत. जोनाथन प्रभू आणि डेव्हिड प्रभू अशी त्यांची नवे आहेत.
रकुल प्रीत सिंहला एक धाकटा भाऊ आहे त्याचं नाव अमन प्रीत सिंह असं आहे. तो सध्या हैदराबादच्या गचिबोवली येथे असलेली रकुलची F45 जिमसांभाळत आहे. शिवाय अमनने अभिनयाचं प्रशिक्षणही घेतलं आहे. तो सिनेसृष्टीत पदार्पण करण्याची संधी शोधत आहे.
साऊथ सुपरस्टार महेश बाबूला प्रियदर्शनी घट्टमनेनी, पद्मावती घट्टमनेनी आणि मंजुला घट्टमनेनी नावाच्या तीन बहिणी आहेत.यांच्यामध्ये फारच छान बॉन्डिंग आहे.
मल्याळम अभिनेता सलमान दुलकरला एक छोटी बहीण आहे. तिचं नाव कुट्टी सुरुमी असं आहे. तिचं लग्न झालं आहे. तिला एक मुलगादेखील आहे.