बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. राखी सावंतने नुकतंच बॉयफ्रेंड आदिल दुरानीसोबत लग्न केल्याचा खुलासा करत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. दरम्यान सोशल मीडियावर राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता राखी सावंतने आपलं नाव बदलल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राखी सावंतने एका मुलाखतीत सांगितलं आहे कि, या लग्नासाठी राखीने आपलं नाव बदलून फातिमा असं ठेवलं आहे. राखी सावंतने आपण आदिलसोबत 7 महिन्यांपूर्वी लग्न केल्याचं म्हटलं आहे. मात्र अभिनेत्रीने आता लग्नाचा खुलासा केला आहे. लग्नानंतर आदिल आपल्याशी बोलत नसल्याचं राखीच म्हणणं आहे.त्यामुळेच आपण आपलय लग्नाचा खुलासा सर्वांसमोर केल्याचं तिने सांगितलं. राखी सांगते आदिलने आपल्यासोबत लग्न करुनसुद्धा इतर एका मुलीसोबत अफेयर सुरु ठेवलं आहे. त्यामुळे मला आमच्या लग्नाचं सत्य समोर आणावं