

अभिनेत्री सनी लिओनी आणि उर्वशी रौतेला नंतर आता पंचनामा फेम अभिनेत्री सोनाली सहगलनं सुद्धा बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.


सध्या लॉकडाऊनमुळे घरीच असलेल्या सोनलीनं फोटोशूटसाठी चांगला पर्याय शोधला आहे. सोनालीनं चक्क तिच्या किचनमध्येच बोल्ड फोटोशूट केलं आहे.


सोनालीनं तिचे हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं हे फोटोशूट तिनं तिच्याच किचनमध्ये केल्याच सांगितलं आहे.


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये सोनाली ब्लॅक आणि रेड आउटफिट्समध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यासोबत तिनं व्हाइट स्निकर्स घातले आहेत.


घरातल्या किचनमध्ये करण्यात आलेल्या सोनालीच्या या फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. यामध्ये ती किचनच्या कॅबिनेटवर बसून सेक्सी पोझ देताना दिसत आहे.


बाकी सेलिब्रेटींप्रमाणे सोनाली सुद्धा सध्या कोरोना व्हायरसमुळे होम क्वारंटाईन आहे. मात्र ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.