शाहरुख खानचा हा पडदयावर दमदार कमबॅक समजला जात आहे. खूप वर्षानंतर शाहरुखने हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान तब्बल ४ वर्षानंतर पडद्यावर झळकला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे.
शाहरुख खानच्या पठाणने केजीएफ, बाहुबली, पुष्पा, आरआरआर या चित्रपटांच्या ओपनिंग डेचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत भारतात ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर जगभरात ६०० कोटींपेक्षा मोठा पल्ला गाठला आहे. देशात पठाणची एकूण कमाई ३२८. २५ इतकी झाली आहे.
या कमाईच्या मोठ्या आकड्यानंतर या सिनेमाचे तिकीट कमी करण्यात आले आहेत. अवघ्या पाच-सहा दिवसांतच तिकीटची किंमत कमी झाल्याने चाहते खुश आहेत.