शाहरुख खान-दीपिका पादुकोणचा 'पठाण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान 'पठाण'चं नेमकं काय झालं असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत आहे. आता पठाणबाबत नवी अपडेट समोर आली आहे. पठाणच्या रिलीजला तब्बल सोळा दिवस उलटले आहेत. नुकतंच समोर आलेल्या ट्रेड रिपोर्ट्सनुसार, पठाणचा बॉक्स ऑफिसवर अजूनही दबदबा कायम असलेला दिसून येत आहे. पठाणने ओपनिंग डेला भरघोस कमाई करत सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढले होते. पठाणने सोळाव्या दिवशी 5.75 कोटींचा गल्ला कमावला आहे. यासोबतच पठाणने देशांतर्गत तब्बल 452 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर शाहरुख खानच्या या चित्रपटाने जगभरात एकूण 877 कोटी कमावले आहेत.