बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमचा बहुचर्चित 'पठाण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
तब्बल चार वर्षानंतर पडद्यावर पुनरागमन केलेल्या किंग खानची जादू अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे.
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचे केमिस्ट्री पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळाल्याने त्यांचे चाहते जाम खुश आहेत.
चित्रपटाने तिसऱ्या दिवशी भारतात 34. 50 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासोबतच चित्रपटाने भारतात अवघ्या तीन दिवसांत एकूण 150 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.