शिक्षण घेण्यासाठी घासावी लागली होती भांडी, आता सनी देओलनं दिली गाण्याची संधी
पैशाच्या अभावामुळे हंसराज त्याचं शिक्षण पूर्ण करु शकला नाही. ज्या कॉलेजमध्ये तो शिकत असताना त्याच कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तो भांडी धुण्याचं काम करत असे.
सनी देओलच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला सिनेमा पल पल दिल के पास हा सिनेमा फक्त देओल कुटुंबासाठीच खास नाही तर गायक हंसराज रघुवंशीसाठीही खूप खास आहे.
2/ 7
या सिनेमातून हंसराजनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र त्याला ही संधी एवढ्या सहजा सहजी मिळालेली नाही. त्याआधी त्यानं बराच संघर्ष केला आहे.
3/ 7
हंसराजचं पहिलं गाणं 'मेरा भोला भंडरी' प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलं आणि त्यानंतर सनी देओलन त्याला 'पल पल दिल के पास'साठी अप्रोच केलं.
4/ 7
मात्र एक वेळ अशी सुद्धा होती की हंसराजला स्वतःचं पट भरण्यासाठी भांडी सुद्धा घासावी लागली होती. याचा खुलासा हंसराजनं नुकताच एका मुलाखतीत केला.
5/ 7
गायक सुरेश वर्मा यांच्या सल्ल्यावरुन गाण्याची सुरुवात केली होती. त्यानं सुरेश वर्मा यांन गाणं लिहायला सांगितलं होतं ज्यानंतर भोला है भंडारी तयार झालं. ज्याला हंसराजनं आवाज दिला.
6/ 7
पैशाच्या अभावामुळे हंसराज त्याचं शिक्षण पूर्ण करु शकला नाही. ज्या कॉलेजमध्ये तो शिकत होता. त्याच कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तो भांडी धुण्याचं काम करत असे.
7/ 7
मुंबईमध्ये जेव्हा तो सनी देओलला भेटला त्यावेळी त्यानं मेरा भोला हैं भंडारी गाणं गायलं. त्यानंतर त्याला 'पल पल दिल के पास'मध्ये 'आधा भी है ज्यादा' हे गाणं गाण्याची संधी मिळाली.