बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
नुसरत कधी खाजगी आयुष्यामुळे तर कधी तिच्या राजकीय आयुष्यामुळे चाहत्यांचे चर्चेत असते. तसेच अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस लुकमुळेदेखील चर्चेत असते.
नुकतंच नुसरतने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या या फोटोशूटवर आता लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहलंय, 'आता डाएटला बाय म्हणतेय... पुजो इशेगेचे'... या पोस्टवरून अभिनेत्रीने नवरात्रीचा उपवास ठेवल्याचं लक्षात येत आहे.
नवरात्रीसारख्या फेस्टिव्ह सीजनमध्ये ब्रालेटमधील फोटो शेअर केल्याने, आता सोशल मीडियावर लोक तिची खिल्ली उडवत आहेत.
अनेक युजर्सनी लिहलंय, ' बघा, संसदेचे खासदार... तर एकाने लिहलंय, तुम्ही खासदार असाल तर जनतेत जा आणि लोकांच्या समस्या सोडवा'.