टीव्हीवरील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक अशी अभिनेत्री निया शर्माची ओळख आहे.निया नेहमीच आपल्या लुकमुळे चर्चेत असते.
निया सोशल मीडियावर सतत आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आपल्या बोल्ड लुकमुळे ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.
नुकतंच निया शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये निया शर्मा आपला मानलेला भाऊ सिद्धार्थ पी मल्होत्राला राखी बांधताना दिसून येत आहे. सिद्धार्थ निर्मित 'एक हजारों में मेरी बहना है' मालिकेत नियाने काम केलं होतं.
परंतु राखी बांधताना नियाने डीप नेकचा वेस्टर्न पिंक ड्रेस परिधान केला आहे. यामधून तिचे क्लीवेज रिव्हील होत आहेत.
या ड्रेसवरुन नेटकरी तिला ट्रोल करु लागले आहेत. एकाने कमेंट करत लिहलंय, 'आजच्या दिवशी तरी चांगला ड्रेस घालायचा'. अशाप्रकारच्या अनेक नकारात्मक कमेंट्स या फोटोंवर आलेल्या पाहायला मिळत आहेत.
निया शर्माला सख्खा भाऊसुद्धा आहे. त्याचं नाव विनय शर्मा आहे. ते सतत एकेमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.