साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून नयनताराला ओळखलं जातं. तिला साऊथची लेडी सुपरस्टार असंही म्हटलं जातं. सध्या नयनतारा आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्री किंग खान शाहरुखसोबत हिंदीमध्ये पदार्पण करणार आहे. नयनतारा आणि शाहरुख खान 'जवान' या बहुचर्चित सिनेमात झळकणार आहेत. यामध्ये अभिनेत्याची दुहेरी भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान नयनताराबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. बॉलिवूड डेब्यू सिनेमासाठी नयनतारा मोठं पाऊल उचलत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या या सिनेमासाठी साऊथ सुंदरी नयनतारा आपला 16 वर्षांचा नियम मोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमात नयनतारा चक्क बिकिनी परिधान करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मोठ्या प्रयत्नांनी निर्मात्यांनी अभिनेत्रीला यासाठी तयार केल्याचं म्हटलं जात आहे. नयनतारानेसुद्धा अगदी विचारपूर्वक हा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.