'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून परी अर्थातच बालकलाकार मायरा वैकुळने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मायरा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. चिमुकली मायरा वैकुळ सतत आपले नवनवीन फोटोशूट करत असते. नुकतंच मायराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. मायराने फोटो शेअर करत 'मेहंदी है रचनेवाली' असं म्हटलं आहे. आता चिमुकली मायरा कोणच्या मेहंदी सोहळ्यासाठी तयार झालीये असा प्रश्न सर्वांच्याच मनात होता. मायरा वैकुळ आपल्या मावशीच्या लग्नासाठी नाशिकला पोहोचली आहे. दरम्यान या गोंडस मुलीने आपल्या मावशीच्या मेहंदीमधील आपला गोड लूक शेअर केला आहे नेहमीप्रमाणेच मायराचे हे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.