'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून 'सुमी' च्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता धोंगडे होय. अमृताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अमृता धोंगडे फारच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसून येत आहे. अमृताने ब्रालेट ड्रेसमध्ये सर्वांनाच घायाळ केलं आहे. फोटोग्राफर अक्षय परांजपेनेसुद्धा आपल्या पेजवर अमृताचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या अमृताला 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. अमृताने बिग बॉस मराठी विजेता विशाल निकमसोबत 'मिथुन' या चित्रपटात काम केलं आहे. अमृता धोंगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.