HBD Milind Soman: 'न्यूड फोटोशूट, 26 वर्ष लहान मुलीशी लग्न'; मिलिंद सोमण या गोष्टींमुळे राहिलाय चर्चेत
मिलिंद सोमणने छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. मिलिंद सोमन त्याच्या काळातील सुपरमॉडेल राहिला आहे. त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
लाखो हृदयाची धडकन आणि भारताचा 'आयर्न मॅन' म्हणून ओळखला जाणारे मॉडेल, अभिनेता म्हणजे मिलिंद सोमण. आज त्याचा 57 वा वाढदिवस आहे. त्याच्या या खास दिवशी त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
2/ 8
मिलिंदच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. त्यानं वय हा फक्त एक आकडा असल्याचं सिद्ध केलं आहे.
3/ 8
मिलिंद सोमण त्याच्या काळातील सुपरमॉडेल राहिला आहे. तो त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. या वयातही तो पुशअप्स करतानाचे व्हिडीओ अनेकदा शेअर करतो.
4/ 8
या वयातही मिलिंद सोमणची फिटनेस पाहून भलेभले अवाक् होतात.
5/ 8
मिलिंद सोमण मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच प्रसिद्धीच्या झोतात आला जेव्हा त्याने एका कंपनीच्या जाहिरातीसाठी हनी स्प्रेसह न्यूड फोटोशूट केलं. या फोटोशूटने सगळीकडे खळबळ माजली होती.
6/ 8
न्यूड फोटोशूटनंतर मिलंद सोमण त्याच्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीशी प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आला होता. आपल्यापेक्षा 26 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोंवरशी लग्न केले. दोघांच्या वयातील अंतराची बरीच चर्चा झाली होती.
7/ 8
मिलिंद सोमणने छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. कॅप्टन व्योम या नाटकाने त्याला टीव्हीवर खूप प्रसिद्धी मिळाली. याशिवाय त्याने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्येही अभिनयाची छाप सोडली आहे.
8/ 8
मिलिंद सोमण सोशल मीडियावर बराच सर्किय असून तो कायमच लोकांना फिटनेसविषयी टीप्स देताना दिसतो.