मालिकेत परीची भूमिका बालकलाकार मायरा वैकुळने साकारली आहे. या भूमिकेमुळे मायाराला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
अर्थातच मायराची आई तिचं सोशल मीडिया अकाउंट हॅन्डल करते. चिमुकली मायरा सतत नवनवीन फोटोशूट करत असते.
माझी तुझी रेशीमगाठ मालिका अवघ्या दोन दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान मायराबाबत एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे.
नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मायराने आपल्या सेटवरील संपूर्ण शेड्युल सांगितला. यावेळी मायरा म्हणाली, 'सेटवर आल्यानंतर ती सर्वात आधी कॅमेऱ्याला नमस्कार करते'.