झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' या आठवड्यातही आपलं अव्वल स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेनं सुरवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असून यात वेळोवेळी केलेल्या बदलांमुळे या मालिकेला प्रेक्षकांनी नेहमीच पहिली पसंती दिली आहे.
या आठवड्यात 'तुझ्यात जीव रंगला' टीआरपी रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. अजली आणि राणा यांचा संसार आता वेगळ्या वळणावर असून यात राणा अंजलीला प्रत्येक वळणावर साथ देताना दिसत आहे.
सर्वांना पोट धरुन हसायला लावणारा कॉमेडी शो या आठवड्यात टीआरपी रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांवर आहे. हा शो फक्त मराठीच नाही तर इतर भाषिक लोकांमध्येही लोकप्रिय ठरत आहे. निव्वळ मनोरंजनाच्या हेतूनं सुरू झालेल्या या शोनं आता लोकांच्या मनात सवतःचं वेगळ स्थान निर्माण केलं आहे.
'Love Beyond The Age' अशी टॅगलाईन असलेली मालिका 'तुला पाहते रे'नं सुरुवातीला जोरदार मुसांडी मारत टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलं होतं मात्र मध्यंतरीच्या काळात या मालिकेची लोकप्रियता काहीशी कमी झाली होती. पण आता या मालिकेनं पुन्हा एकदा टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं आहे. या आठवड्यात ही मालिका टीआरपी रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर आहे
डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली 'स्वराज्य रक्षक संभाजी' ही मालिका या आठवड्यात टीआरपी रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर आहे.