सध्या सोशल मीडियावर 'बॅन लिपस्टिक' हा हॅशटॅग चांगलाच प्रचलित झाला आहे. विशेष म्हणजे हा हॅशटॅग वापरत मराठीमधील काही आघाडीच्या अभिनेत्रींनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामुळे हा हॅशटॅग कशासाठी आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
तेजस्विनी पंडित ने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत #बॅनलिपस्टिक हा हॅशटॅग वापरला आहे. 'मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही. बॅनलिपस्टिक' असे म्हणत तेजस्विनीने लिपस्टिक पुसून टाकली.
अभिनेत्री सोनाली खरेने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने देखील #बॅनलिपस्टिक हॅशटॅग वापरला आहे. शिवाय तिने या व्हिडिओमध्ये तेजस्विनी पंडित ला टॅग केले आहे.
अभिनेत्री धनश्री काडगावकरने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने देखील #बॅनलिपस्टिक हॅशटॅग वापरला आहे. शिवाय तिने या व्हिडिओमध्ये तेजस्विनी पंडित ला मी सपोर्ट करते असे देखील म्हटलं आहे.
अभिनेत्री गौरी नलावडेने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने देखील #बॅनलिपस्टिक हॅशटॅग वापरला आहे. शिवाय तिने या व्हिडिओमध्ये तेजस्विनी पंडित ला मी सपोर्ट करते असे देखील म्हटलं आहे.
अभिनेत्रींच्या या पोस्टमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. फक्त चाहतेच नव्हे तर तिचे कलाकार मित्र सुद्धा गोंधळून गेले आहेत.
तेजस्विनी पंडितच्या पोस्टवर मराठी डिरेक्टर संजय जाधव यांनी कमेंट करत 'क्या हुआ भाई' असं म्हटलं आहे. तर एका युजरने हा सर्व एखाद्या प्रमोशनचा भाग असेल असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या युजरने नवीन चित्रपट येत असेल, असं म्हटलं आहे. तर आणखी एका युजरने हे काय नवीन असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने पुसायचीच होती तर लावली कशाला असा प्रश्न केला आहे. तर एकाने कमेंट करत म्हटलं आहे, सगळ्या चित्रपटांमध्ये तर सर्वात जास्त लिपस्टिक तू लावतेस'. अशा अनेक कमेंट्स अभिनेत्रींच्या या व्हिडिओवर येत आहेत.
मेकअप आणि त्यातल्या त्यात लिपस्टिक हा मुलींच्या जिव्हळ्याचा विषय समजला जातो. प्रत्येक स्त्रीला नटनं-तयार होणं फारच आवडतं. अनेक महिला मुली आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा लूक आणि फॅशन सेन्स फॉलो करत असतात.मात्र एका अभिनेत्रीनेच लिपस्टिक बंद सारखा संदेश दिल्याने महिलावर्गसोबतच सर्व चकित झाले आहेत.
मात्र अभिनेत्रीने हा व्हिडीओ का बनवला. त्या मागे नेमकं काय कारण आहे. किंवा लिपस्टिक का बॅन या प्रश्नच उत्तर अजूनही मिळालेलं नाहीय. अभिनेत्रीने याबद्दल आजू कोणताच खुलासा केलेला नाही.