'होणार सून मी या घरची या मालिकेत तेजश्रीनं साकारलेली जान्हवी असेल किंवा ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत साकारलेली शुभ्रा असेल प्रेक्षकांनी नेहमीच तिच्यावर भरभरून प्रेम केलं.
अशातच तेजश्री पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याचं समोर आलंय. याविषयी टीआरपी मराठीने एक पोस्ट शेअर केली आहे.
टीआरपी मराठीच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये 'लवकरच टेलिव्हिजन वर भेटायला येणार तेजश्री प्रधान' म्हटलं आहे.
अद्याप तेजश्री प्रधान कोणत्या मालिकेत झळकणार हे स्पष्ट झालं नाहीये. मात्र प्रेक्षक तेजश्रीला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
दरम्यान, तेजश्री कधी चाहत्यांना गुडन्यूज देणार आणि छोट्या पडद्यावर परतणार यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.