कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा मोठा फटका मनोरंजसृष्टीला बसला आहे. परिणामी सर्वसामान्य लोकांसोबतच अनेक नामांकित कलाकार मंडळी देखील बेरोजगार झाले आहेत.
2/ 7
लॉकडाउनच्या काळात काम मागणारे अनेक कलाकार आपण पाहिले. यामध्ये मराठ अभिनेत्री शाश्वती पिंपळेकर देखील होती.
3/ 7
शाश्वतीने देखील सोशल मीडियावरद्वाके निर्मात्यांना काम मागितलं होतं.
4/ 7
“नमस्कार माझं नाव शाश्वती पिंपळेकर. मी एक अभिनेत्री आहे. जर एखाद्या वेब सीरिज, मालिका, चित्रपटात माझ्यायोग्य एखादी भूमिका असेल तर संपर्क साधावा.” असा मेसेज तिने सोशल मीडियाद्वारे दिला होता.
5/ 7
परंतु लक्षवेधी बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी इतरांकडे काम मागणाऱ्या या अभिनेत्रीने आता स्वत:च उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.
6/ 7
तिने मुद्रपाकखाना नावाचं एक हॉटेल सुरु केलं आहे. या हॉटेलमध्ये मराठमोळ्या पद्धतीच जेवण मिळतं. या हॉटेलद्वारे तिने अनेक बेरोजगारांना काम देखील दिलं आहे.
7/ 7
शाश्वतीने आतापर्यंत ‘चाहूल’, ‘पक्के शेजारी’, ‘सिंधू’, ‘बालक पालक’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.