मराठमोळ्या सई ताम्हणकरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तिचा चाहतावर्ग वाढत चाललेला पहायला मिळत आहे. कोणत्या न कोणत्या कारणामुळे सई कायमच चर्चेत असते. अशातच सई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सईने तिच्या इन्स्टाग्रामवर नवं फोटोशूट शेअर केलं आहे. हे फोटोशूट ब्लॅक अॅण्ड व्हाईट थीममध्ये केल्याचं दिसतंय. सईच्या या नव्या हटके फोटोशूटवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 'सुंदर, हॉट, निरागस, कसली गोड दिसते गं तू, ब्यूटी', अशा अनेक प्रतिक्रिया सईच्या फोटोशूटवर येत आहेत. सईने हे फोटो शेअर करताच काहीच क्षणातच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, सईने मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सई लवकरच तिचा आगामी चित्रपट 'इंडिया लॉकडाऊन'मध्ये झळकणार आहे. यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असून या चित्रपटात लॉकडाऊन काळातील परिस्थिती दर्शवली आहे.