मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधत असते.
नुकतंच सईने तिच्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. फोटोतील तिने घातलेल्या ड्रेसमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे.
सईने हा लेटेस्ट पेहराव 'एले ब्युटी अवॉर्ड्स 2022'साठी केला होता. मात्र या ड्रेसमुळे सई ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
'दिवाळीचा कंदील, हा ड्रेस आहे का मंडपच्या झालरी आहेत, तेच म्हटलं लग्नाच्या मंडपत्ला पर्दा गेला कुठ', अशा अनेक कमेंट तिच्या लेटेस्ट फोटोंवर येत आहेत.
सईची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. ती कायमच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असते.