मराठी अभिनेत्री पूजा सावंत सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. पूजा सावंत लकरच मराठीतील क्युट अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत दिसणार आहे. या दोघांनी नुकतंच आपल्या सोशल मीडियावरुन आपल्या नव्या चित्रपटाची माहिती दिली आहे. पूजा आणि सिद्धार्थच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'काँग्रॅच्युलेशन्स' असं आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबलदेखील दिसणार आहेत. प्रसिद्ध मराठमोळे दिग्दर्शक लोकेश विजय गुप्ते यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. नुकतंच पूजा आणि लोकेश विजय गुप्ते यांनी आणखी एका चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटाचं नाव 'माय डॅडस वेडिंग' असं असून त्याच शूटिंग लंडनमध्ये पूर्ण झालं. या चित्रपटात पूजासोबत ज्येष्ठ अभिनेते अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. त्यांनतर लगेचच पूजाने आपल्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.