जितेंद्रने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''अशी सुरु होते माझी सकाळ!कान्सचे हे जे काही आठवडे आहेत. हे पुढे काही महिन्यांमध्ये बदलावेत. आणि त्यांनतर याच महिन्यांची काही वर्षे व्हावीत अशी इच्छा आहे. अशा रसिक प्रेक्षकांसह आणि जगातील सर्वोत्तम चित्रपटगृहांपैकी एक असलेल्या येथे राहून दररोज सिनेमा पाहण्याची माझी इच्छा आहे!!! सिनेमा जिंदााबाद''.
या चित्रपटात जितेंद्र जोशीसोबतच तगडी स्टार कास्ट पाहायला मिळाली होती. नीना कुळकर्णी, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे, सखी गोखले, विक्रम गोखले आणि संजय मोने असे प्रतिभावान कलाकार या चित्रपटात दिसून आले आहेत. दिग्दर्शनाची धुरा निखील महाजन यांनी सांभाळली होती. तर संवाद प्राजक्त देशमुख यांचे आहेत. या चित्रपटातील गाणी स्वत: जितेंद्रनी लिहीली आहेत.