अमेय जेवढा उत्तम अभिनेता आहे तेवढाच तो उत्तम विनोदवीरही आहे. तो नेहमीच काहीतरी भन्नाट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
अमेयने नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे. त्यानं काळ्या कलरच्या सूटबूटमध्ये हे नवं फोटोशूट केलं असून अमेयच्या या फोटोंनी सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
या फोटोसोबत त्यानं भन्नाट असं कॅप्शनही दिलंय. 'खरं सांगतो ..tuxedo घालून photoshoot केलं पण भूक लागल्यावर वडापाव खाल्ला', असं अमेय म्हटला.
अमेय नेहमीच त्याच्या फोटोंपेक्षा कॅप्शनने लक्ष वेधतो. त्याच्या प्रत्येक पोस्टला भन्नाट कॅप्शन हे पहायला मिळतंच.
दरम्यान, अमेयमे दिल दोस्ती दुनियादारी, फास्टर फेणे, झोंबिवली, धुरळा, मुरांबा, यांसारख्या बऱ्याच चित्रपटांतून आपल्या अभिनयाती छाप सोडली आहे.