मराठीतील प्रसिद्ध अभिनेता अभिजित श्वेतचंद्रचा सेजल वरदेसोबत 23 फेब्रुवारीला विवाह सोहळा पार पडला. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
अभिजीतने जून महिन्यात सेजलसह गुपचूप साखरपुडा उरकला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबत त्याने चाहत्यांना माहिती दिली होती.