बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आजही तितकीच फिट आणि ग्लॅमरस आहे. अभिनेत्री नेहमीच आपल्याला जिम आणि योगा करताना दिसून येते. अनेक तरुणी तिचा डाएट प्लॅन आणि डेली रुटीन फॉलो करताना दिसून येतात. नेहमीच डाएट आणि वर्कआउट फॉलो करणाऱ्या मलायकाला चमचमीत पदार्थांवर ताव मारताना क्वचितच पाहायला मिळतं. आज मलायकाने रविवारचा निमित्त साधत काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने चिकन बिर्याणीपासून ते फ्रेंच टोस्टपर्यंत अनेक स्वादिष्ट पदार्थ शेअर केले आहेत. अभिनेत्रीने हे सर्व पदार्थ आपल्या घरी बनवले आहेत. चाहत्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वच लोक या फोटोंवर कमेंट्स करत आहेत. मलायका अरोरा सोशल मीडियावर सतत काही ना काही शेअर करत चर्चेत असते.