बीझी शेड्युची तक्रार करणाऱ्या सेलिब्रेटींना Lokdoen मुळे त्यांचे छंद जोपासायची संधी मिळाली आहे आणि मलायका या संधीचा पुरेपूर वापर करत आहे.
|
1/ 7
सध्या लॉकडाउनमुळे सर्वच बॉलिवूड सेलिब्रेटी घरी आहेत. त्यामुळे बीझी शेड्युची तक्रार करणाऱ्या या सेलिब्रेटींना त्यांचे छंद जोपासायला आयतीच संधी मिळाली आहे. त्यामुळे मलायका या संधीचा पुरेपूर वापर करत आहे.
2/ 7
मलायकाला अभिनया व्यतिरिक्त जेवण बनवण्याची खूप आवड आहे. त्यामुळ सध्या लॉकडाउनच्या काळ ती तिच्या आवडीचे पदार्थ बनवून घालवताना दिसते.
3/ 7
मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात ती बेसनाचे लाडू बनवताना दिसत आहे.
4/ 7
मलायका तिच्या किचनमध्ये अगदी तुमच्या-आमच्यासारखीच सराइतपणे वावरताना दिसते आहे.
5/ 7
मलायकाचे बेसनाचे लाडू बनवतानाचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप हिट झालेले पाहायला मिळत आहेत.
6/ 7
हे लाडू बनवत असताना मलायकानं तिच्या चाहत्यांना एक मेसेजही दिला आहे. ती म्हणते, 'घरी राहा. सुरक्षित राहा आणि खाण्याचे वेगवेगळे पदार्थ नक्की बनवून पाहा.'
7/ 7
मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर बेसनाच्या लाडूंचा फोटो शेअर केला आहे. ज्यात तिनं तिला हे लाडू बनवण्यासाठी सल्ला देणाऱ्या शेफचेही आभार मानले आहेत. सध्या मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.