सध्या लॉकडाऊनमुळे इतर सेलिब्रेटींप्रमाणे अभिनेत्री मलायका अरोरा सुद्धा तिच्या घरी आहे. या काळात सर्वांना तिच्या अलीशान घराची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
अरबाज खानपासून वेगळ झाल्यानंतर मलायकानं त्याचं घर सोडल आणि स्वतःच्या दुसऱ्या घरी शिफ्ट झाली. पाहा तिचं हे घर आतून कसं दिसतं.
मलायकाच्या घराचा हा लॉबी एरिया आहे ज्या ठिकाणी ती सणांची सजावट करत असते आणि प्रत्येक फेस्टिव्हला या ठिकाणी एक फोटो नक्कीच घेतला जातो.
ही मलायकाची लिव्हिंग रुम आहे जी तिनं खूप खास पद्धतीनं सजवली आहे. अनेकदा मलायका या ठिकाणी बसून फोटो क्लिक करताना दिसते.
मलायकाच्या घराची बाल्कनी. ही मलायकाची घरातली आवडती जागा आहे. ही जागा तिनं काही झाडं लावून सजवली आहे.