आज मकर संक्रांतीचा सण देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. सर्वसामान्य लोकांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण मोठया उत्साहात हा सण साजरा करत आहेत.
यामध्ये असे अनेक मराठी कलाकार आहेत जे लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र मकर संक्रांतीचा सण साजरा करत आहेत.
यामध्ये हार्दिक जोशी-अक्षया देवधरपासून ते शिवानी रांगोळे- विराजस कुलकर्णी अशा कलाकारांचा समावेश आहे.
नुकतंच शिवानी रांगोळेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या लग्ना नंतरच्या पहिल्या मकर संक्रांतिचे फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये शिवानी आणि विराजस फारच गोड दिसत आहेत. शिवानीने काळ्या रंगाची पारंपरिक साडी नसेल आहे तर विराजसने काळा कुर्ता परिधान केला आहे.