'नेहा'च्या साखरपुड्याची की लग्नाची तयारी? मराठमोळ्या लुकमध्ये अभिनेत्रीचे Photo आले समोर
'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका काही वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील 'नेहा कामत' हे पात्र अभिनेत्री प्रार्थना बेहेरे साकारत आहे. दरम्यान या मालिकेत नवा काय ट्विस्ट पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात.
'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका काही वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील 'नेहा कामत' हे पात्र अभिनेत्री प्रार्थना बेहेरे साकारत आहे. दरम्यान या मालिकेत नवा काय ट्विस्ट पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात.
2/ 11
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने इन्स्टाग्रामवर मराठमोळ्या लुकमध्ये काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती फारच सुंदर दिसते आहे
3/ 11
'Saree Love' असं कॅप्शन देत प्रार्थनाने हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने काठापदराची साडी आणि त्यावर साजेसे दागिने परिधान केले आहेत. याशिवाय तिचा गजरा प्रार्थनाच्या सौंदर्यात भर घालत आहे
4/ 11
दरम्यान हा फोटो माझी तुझी रेशीमगाठच्या सेटवरचा आहे की नाही, याबाबत प्रार्थनाने स्पष्ट काही लिहिले नसले तरी तिने #mazituzireshimgath असा हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे हा फोटो अपकमिंग एपिसोडमधील असावा असा अंदाज आहे
5/ 11
शिवाय प्रार्थनाने #padwaspecial असा हॅशटॅगही हा फोटो शेअर करताना वापरला आहे. याचा अर्थ हा फोटो अपकमिंक पाडव्याच्या एपिसोडच्या शूटिंगदरम्यानचा असावा. मात्र या मालिकेच्या चाहत्यांनी मात्र यावर वेगळ्याच कमेंट केल्या आहेत.
6/ 11
नेहाच्या फोटोवर कमेंट करताना एका युजरने म्हटलं आहे की नेहाच्या लग्नाची तयारी सुरू आहे, तर एकाने ही साखरपुड्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे.
7/ 11
प्रार्थनाने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यावर अनेक सेलिब्रिटींनी देखील तिचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.
8/ 11
याआधी देखील प्रार्थना बेहेरेने साडी लुकमध्ये इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते
9/ 11
या फोटोमध्ये प्रार्थना व्हाईट सारी आणि ग्रीन ब्लाऊजमध्ये फारच खुलून दिसत आहे.
10/ 11
इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने हातात हिरव्या रंगाचा चुडादेखील घातला आहे.
11/ 11
अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताच, चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स द्यायला सुरवात केली आहे.