नम्रता संभेराव ही महाराष्ट्रातील एका उत्कृष्ट हास्यकलाकारांपैकी एक आहे.'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून नम्रता घराघरात पोहोचली आहे.
नम्रता संभेरावचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात.
या दोघांची लव्हस्टोरी फारच हटके आहे. योगेशने कॉलेजमधील विविध कार्यक्रमांत नम्रताला अभिनय करताना पाहिलं होतं. योगेश तिच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता.
हळूहळू योगेशने नम्रतासोबत मैत्री वाढवली. शिवाय त्याने तिला सोशल मीडियाचा आधार घेत मेसेजसुद्धा केला. अशाप्रकारे या दोघांच्यात घट्ट मैत्री झाली होती.
योगेशच्या घरी लग्नाचा विषय निघताच त्याने नम्रतासोबतच लग्न करायचं ठरवलं होतं. आणि त्याने नम्रताला प्रपोजसुद्धा केलं. तिलासुद्धा योगेश आवडत असल्याने तिने तात्कळ लग्नाला होकार दिला होता.
विशेष म्हणजे योगेश आणि नम्रता एकाच गावचे रहिवासी आहेत. या दोघांना रुद्रराज नावाचा एक मुलगासुद्धा आहे.