'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रसिद्धीस आले आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे शिवाली परब होय.
शिवाली परबच्या खाजगी आयुष्याबाबत अनेकांना फारशा गोष्टी माहिती नाहीत. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
डान्सर बनायला आलेल्या शिवाली परबने खरं तर या क्षेत्रात येण्यापूर्वी एका सरकारी नोकरीसाठी अर्ज केला होता. परीक्षासुद्धा दिली होती.
मात्र तिच्या आयुष्यात 'युथ फेस्टिव्हल' टर्निंग पॉईंट ठरल्याचं ती सांगते. या युथ फेस्टिव्हलमुळे तिला छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली.
तसेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बाबत सांगताना शिवालीने म्हटलं होतं की, एका स्किटदरम्यान अभिनेत्री नम्रता आवटेने तिला पाहिलं होतं.
तिचा अभिनय बघून नम्रताने तिला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'साठी बोलावलं होतं. अशाप्रकारे या लोकप्रिय कार्यक्रमात शिवालीची वर्णी लागली होती.