'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून अभिनेते समीर चौगुले घराघरात पोहोचले आहेत.
काही दिवसांपूर्वी ते प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या चित्रपटात बत्ताशाची लक्षवेधी भूमिका साकारली होती.
समीर चौगुले यांनी पोस्ट करत लिहलंय, ''आनंदाची बातमी शेयर करावीशी वाटली.....काल झालेल्या नवराष्ट्र आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत चित्रपट आणि ओटीटी पुरस्कार सोहळ्यात मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (बत्ताशा -चित्रपट चंद्रमुखी) हा पुरस्कार मिळाला...याचे संपूर्ण श्रेय Prasad Oak Manjiri Oak यांचे आहे..... ''
त्यांनी पुढे लिहलंय, ''"बात्तशा" या भूमिकेसाठी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासासाठी मनापासून प्रेम आणि आभार.....मित्र खूप असतात पण ठामपणे मागे उभे राहणारे खूप कमी.....माझे गुरू विश्वास सोहनी यांचे खूप आभार.. आणि सर्वात महत्त्वाचं सर्व मायबाप प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार....thank you''