'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने सध्या तुफान चर्चेत आहे. अभिनेता व्यावसायिक नव्हे तर आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
विशेष म्हणजे या फोटोमध्ये ती निखिल बनेसोबत दिसून येत आहे. त्यामुळे या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे.
आता या फोटोबाबत अखेर निखिलने मौन सोडलं आहे. नुकतंच एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत निखिलने या फोटोबाबत संवाद साधला.
यावेळी बोलताना निखिल म्हणाला, 'मला या चर्चांबाबत काहीही बोलायचं नाही कारण आम्ही दोघेही सध्या ट्रेंडमध्ये आलो आहोत. आणि आम्हाला याची मज्जा वाटत आहे.
स्नेहलबाबत सांगायचं तर आम्ही कॉलेजपासूनचे चांगले मित्र आहोत. आम्ही अनेक दिवसांनी भेटल्यानंतर फोटो क्लिक करण्याची संधी सोडत नाही.
त्यादिवशी लग्नात चांगला कॅमेरा होता. त्यामुळे फोटो काढण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. त्या एका फोटोवरुन इतक्या बातम्या झाल्या.
बाकी आम्ही चांगले मित्र आहोत आणि कायमच मित्र राहणार मग कितीही बातम्या होऊदेत. असं म्हणत निखिलने स्नेहल आणि आपण फक्त मित्र असल्याचं स्पष्ट केलं आहे.