'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री नम्रता संभेराव महाराष्ट्रातचं नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.
नम्रता संभेराव सध्या 'कुर्रर्रर्र' या नाटकासाठी अमेरिका दौऱ्यावर गेली आहे. तब्बल १ महिन्याचा हा दौरा आहे.
आणि म्हणूनच अभिनेत्रीने पोस्ट लिहलत म्हटलंय, 'निघालो साता समुद्रापलीकडे फॅमिली पासून दूर महिनाभर लेकरापासून लांब चाललेय जड पावलांनी निरोप घेताना ऊर भरून आला होता पण हरकत नाही नाटकाचा अमेरिका दौरा यशस्वीरीत्या पार करून येऊच लवकर तूर्तास bye bye #usa#drama #tour #natak #kurrr''