कंगना रणौतचा (Kangana Ranaut) शो लॉक अप (Lock Upp) आता फिनालेच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे. या शोमध्ये शिवम शर्मा, मुनव्वर इकबाल फारूकी आणि प्रिन्स नरूला हे आतापर्यंत फायनलमध्ये पोहोचले आहेत. दरम्यान सोशल मीडियावरील अडल्ड कंटेटसाठी प्रसिद्ध असणारी पूनम पांडे (Poonam Pandey) देखील या शोचा भाग आहे. अलीडे तिने वोट्ससाठी असं काही वक्तव्य केलं आहे की जेलमधील इतर कैदी आणि चाहतेही हैराण आहेत.