बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळे सध्या प्रचंड चर्चेत आली आहे.
2/ 8
अलीकडे क्रिती सेनन आणि तिचा 'आदिपुरुष' सह-कलाकार प्रभासचं नाव जोरदार ट्रेंड होत आहे. याचं कारणदेखील तितकंच खास आहे.
3/ 8
सध्या बॉलिवूडमध्ये क्रिती सेनन आणि बाहुबली स्टार प्रभासच्या अफेयर्सच्या चर्चांना उधाण आलं आहे.
4/ 8
क्रिती आणि प्रभास लवकरच 'आदिपुरुष' या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे.
5/ 8
या चित्रपटाच्या सेटवरच क्रिती आणि प्रभासमध्ये जवळीकता निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.
6/ 8
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, आदिपुरुषच्या सेटवर क्रिती आणि प्रभासमध्ये पहिल्याच दिवसापासून फार छान बॉंडिंग झालं आहे. प्रभास फारच लाजरा आहे तो आपल्या सह-अभिनेत्रींशी फारसं बोलत नाही.
7/ 8
परंतु अभिनेता क्रिती सेननच्या फारच जवळ आल्याचं म्हटलं जात आहे. हे दोघे सेटवर बराच वेळ सोबत घालवत होते असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
8/ 8
शिवाय शूटिंग संपल्यानंतरही हे दोघे संपर्कात आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना आपल्या नात्याबाबत आत्ताच कोणतीही वाच्यता करायची नाहीय. असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र क्रिती आणि प्रभासकडून याबाबतची कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय.