बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टींची लेक अभिनेत्री अथिया शेट्टी नुकतंच भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्नबंधनात अडकली आहे. या सेलिब्रेटी कपलच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली. दोघांच्या लग्नासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. लग्नानंतर या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये लग्नातील अनेक फॅमिली फोटोसुद्धा आता समोर येत आहेत. या सर्व फोटोंमध्ये एका व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे अहान शेट्टीची गर्लफ्रेंड होय. अथियाची होणारी वाहिनी अर्थातच तानिया श्रॉफसुद्धा या लग्नात उपस्थित होती. सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून तानिया श्रॉफला डेट करत आहे. अहान आणि तानिया सतत सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. अहान शेट्टीने 'तडप' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.