सलमान खान नुकतंच आपल्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईला पोहोचला होता. सलमान खानचे दुबईतील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या फोटोंमध्ये सलमान खान भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाच्या मुलासोबत दिसून येत आहे. दुबईत सलमान खानची भेट सानिया मिर्झाचा मुलगा इजहान आणि बहीण अनम मिर्झासोबत झाली होती. सलमानने या दोघांसोबत धम्माल करत फोटोसुद्धा क्लिक केले आहेत. सानिया मिर्झा सलमान खानची खूप मोठी चाहती आहे हे तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. या फोटोंमध्ये बहीण आणि मुलासोबत सानिया मिर्झा मात्र दिसून आली नाही.