सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचं नातं आता जगजाहीर झालं आहे. दोघेही पती-पत्नी बनले आहेत. या दोघांच्या लग्नानंतर कियारा आणि सिद्धार्थचं कुटुंबही चर्चेत आलं आहे. आजकाल सर्वाधिक चर्चा आहे ती कियाराची बहीण आणि सिद्धार्थची मेहुणी इशिता अडवाणीची. बॉलिवूडपासून दूर असणारी इशिता स्टाईल आणि सौंदर्याच्या बाबतीत कियाराला पुरेपूर टक्कर देतेय.