बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ६ फेब्रुवारीला लग्न बंधनात अडकणार आहेत. राजस्थान, जैसलमेरमध्ये होणाऱ्या या सेलिब्रेटी कपलच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. आज कियारा अडवाणीच्या हातावर मेहंदी सजणार आहे. सेलिब्रेटी मेहंदी डिझायनर वीणा नागदा कियाराला मेहंदी काढणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्वात आधी गणेशपूजा करुन लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. मेहंदीनंतर हळदी आणि संगीत ठेवण्यात आलं आहे. जैसलमेरच्या आलिशान अशा सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा सुरु आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नासाठी शाहिद-मीरा, करण-मनीष असे अनेक सेलिब्रेटी कलाकार सहभागी होत आहेत.