कीर्ती सुरेश नुकतंच आपल्या 'दसरा' चित्रपटामुळे चर्चेत होती. दरम्यान आता अभिनेत्री आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री फरहान नावाच्या एका तरुणासोबत दिसल्यानंतर या चर्चेला उधाण आलं आहे. हा व्यक्ती दुबईस्थित एक उद्योजक आहे.
कीर्तीने ट्विट करत सांगितलं कि, या सर्वात मला माझ्या मित्राला कधीच ओढायचं नव्हतं. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी त्या मिस्ट्री मॅनला समोर आणेन'.
अर्थातच अभिनेत्रीने ट्विटमधून स्पष्ट केलं आहे की, तो व्यक्ती तिचा मित्र आहे. आणि अद्याप ती लग्न करणार नाहीय.