बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या एखाद्या अभिनेत्या इतकं मानधन घेतात. इतकंच नव्हे तर या अभिनेत्रीची कमाई आपल्या पतींपेक्षाही जास्त आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ अभिनेता विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम सध्या राजस्थानमधील सिक्स सेन्स बरवाडा येथे सुरु आहेत. तत्पूर्वी विकी आणि कतरिनाच्या प्रत्येक गोष्टींची चर्चा सुरु आहे.
तसेच बॉलिवूडमधील बेस्ट कपल म्हणून ओळखलं जाणारं कपल दीपिका आणि रणवीर होय. दीपिका वर्षाकाठी ३१६ कोटी रुपये कमावते. तर पती रणवीर सिंह ३०७ कोटींची कमाई होते.
बॉलिवूडची फिटनेस फ्रिक बिपाशा बसूची कमाईसुद्धा पतीपेक्षा जास्त आहे. बिपाशा वर्षाला ११३ कोटी मिळते. तर करण सिंह ग्रोव्हर १३ कोटी कमावतो.
अभिनेता अभिषेक बच्चनची नेट वर्थ २०३ कोटी आहे. तर दुसरीकडे पत्नी ऐश्वर्या रॉय २२७ कोटी रुपये मिळते.
बॉलिवूडची देशी गर्ल प्रियांका चोप्राची नेट वर्थ तब्बल ७० मिलियन आहे. तर पती निक जोनसची कमाई ३० मिलियनच्या जवळपास आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांचं नेट वर्थ ४४० कोटी इतकं आहे. तर पती आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं ३३५ कोटी रुपये आहे.