कार्तिक आर्यनने बॉलिवूडमध्ये फारच कमी वेळेत अफाट यश मिळवलं आहे. कुटुंबाची कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना कार्तिकने स्वतःला सिद्ध केलं आहे.
कार्तिक आर्यन सध्या बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये गणला जातो. त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.
कार्तिकने इन्स्टाग्रामवर आपल्या आईसोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या आईला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं सांगितलं आहे.
परंतु आशादायक गोष्ट म्हणजे कार्तिकची आई यामधून आता बरी होत आहे. उपचाराचा बऱ्यापैकी टप्पा त्यांनी पूर्ण केला आहे.
कार्तिकने पोस्ट शेअर करत लिहलंय, 'काही काळापूर्वी याच महिन्यात दबक्या पाउलांनी मोठा सी म्हणजेच कॅन्सर आमच्या कुटुंबात शिरला. आमचं आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न करु लागला. आम्ही निराश झालो. असहाय्य झालो. पण त्यापेक्षाही मोठा सी अर्थातच करेज दाखवत आम्ही त्याला तोंड दिलं.
माझ्या आईने धाडसाने याचा सामना केला. मोठं धैर्य दाखवत तिने या आजाराला लढा दिला. आता आम्ही हे युद्ध जिंकल आहे. या सर्वांमध्ये एक गोष्ट कळाली की, कुटुंबच प्रेम आणि पाठिंबा यापेक्षा मोठी महासत्ता कोणती नाही. कार्तिकला सर्वजण धीर देत आईला पूर्णपणे बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.