Throwback Bollywood: देशातील पहिला घटस्फोट घेणारा व्यक्ती होता प्रसिद्ध अभिनेता; करण जोहरसोबत आहे खास कनेक्शन
Karan Johar-IS Johar Connection: तुम्ही जुन्या चित्रपटांचे चाहते असाल तर, तुम्हाला आयएस जोहर नक्की माहिती असतील. आयएस जोहर उर्फ इंदर सेन जोहर हे त्या काळातील विनोदी कलाकार, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक होते.
तुम्ही जुन्या चित्रपटांचे चाहते असाल तर, तुम्हाला आयएस जोहर नक्की माहिती असतील. आयएस जोहर उर्फ इंदर सेन जोहर हे त्या काळातील विनोदी कलाकार, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक होते.
2/ 8
आयएस जोहर हे अतिशय हुशार आणि सुशिक्षित व्यक्ती होते. राजकारण आणि अर्थशास्त्र या दोन विषयांत त्यांनी एम.ए. एलएलबीची पदवीही मिळवली होती.
3/ 8
फाळणीच्या वेदना सहन करणाऱ्या आयएस जोहर यांनी सुरुवातीच्या काळात 'नास्तिक' (लेखक-दिग्दर्शक) नावाचा चित्रपट बनवला होता. ज्याची निर्मिती शशधर मुखर्जी यांनी केली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
4/ 8
आयएस जोहर यांनी मेहमूद यांच्यासोबत अनेक हिट सिनेमे दिले आहेत.या दोघांची जोडी असेल तर सिनेमा हिट समजला जायचा.
5/ 8
मात्र, आयएस जोहरवर कॉमेडियनचा असा शिक्का पडला की, तो कधीच हटला नाही. एक अष्टपैलू अभिनेता आणि लेखक-दिग्दर्शक एक कॉमेडियन बनूनच राहिला.
6/ 8
आयएस जोहर यांची आणखी एक ओळख सांगायची झाली, तर हा अभिनेता आताचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा काका आहे. अर्थातच यश जोहर यांचा भाऊ.
7/ 8
आयएस जोहर यांचं खाजगी आयुष्यसुद्धा फारच रंजक होतं. त्यांनी तब्बल ५ लग्न केले होते.
8/ 8
परंतु त्यांचे घटस्फोटदेखील झाले. असं म्हटलं जातं की, स्वतंत्र भारतातील घटस्फोट घेणारे ते पहिले व्यक्ती होते.