
मुंबई महापालिकेनं बुल्डोझर चालवल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) दुसऱ्या दिवशी आपल्या ऑफिसची अवस्था पाहायला गेली. फोटोत कंगनाच्या चेहऱ्यावरील भाव सर्वकाही सांगून जातात. (फोटो सौजन्य - विरल भयानी)

कंगना 9 सप्टेंबरला मुंबईत येण्याआधीच मुंबई महापालिकेनं तिच्या ऑफिसवर कारवाई करायला सुरुवात केली. (फोटो सौजन्य - विरल भयानी)

कंगनाच्या ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप करत बीएमसीने कारवाई केली (फोटो सौजन्य - विरल भयानी)

कंगनाने मुंबईत येताच हायकोर्टात धाव घेतली आणि आपल्या ऑफिसवरील बीएमसीच्या कारवाईवर तात्काळ स्थगिती मिळवली (फोटो सौजन्य - विरल भयानी)

आपलं आयुष्यात हे एकच स्वप्नं होतं असं कंगना म्हणाली. अकरा वर्षांच्या मेहनतीनंतर आपण आपलं हे स्वप्नं साकारल्याचं तिनं सांगितलं. (फोटो सौजन्य - विरल भयानी)

कंगनाचे हे ऑफिस याच वर्षात जानेवारीमध्ये तयार झालं होतं. याची किंमत 48 कोटींपेक्षाही जास्त आहे. (फोटो सौजन्य - विरल भयानी)




