जान्हवी कपूर ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. बॉलिवूडमध्ये ती अभिनयासह तिच्या लुक आणि स्टाइलसाठीही प्रसिद्ध आहे. दरम्यान, अभिनेत्रीने 'खुश' या आशियाई मॅगझिनसह ब्रायडल फोटोशूट केले आहे. इन्स्टाग्रामवर तिने यामधील काही फोटो शेअरही केले आहेत. यावेळी ती दोन सुंदर लेहंगामध्ये पोज देताना दिसली. याशिवाय फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानीने देखील तिच्या सोशल अकाउंटवर अभिनेत्रीचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य @khushmag/instagram)
या फोटोशूटमध्ये जान्हवी भारतीय नववधूच्या रुपात दिसत आहे. अभिनेत्रीचे या फोटोशूटमधील लेंहंगा फॅशन डिझायनर तरुण तहिलियानी यांनी डिझाइन केले आहेत. यात तिने गळ्यात हेवी चोकर, अंगठ्या, सोन्याच्या बांगड्या, ठसठशीत माँगटिका, नाकात मोठी नथ असा पारंपरिक लुक केला आहे. यामध्ये ती अगदी नव्या नवराईसारखी दिसत आहे. (फोटो सौजन्य-@khushmag/instagram)