अभिनेत्री जान्हवी कपूर बी-टाऊनमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी सतत सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या ग्लॅमरस आणि हॉट अंदाजाने ती चाहत्यांचं लक्ष वेधत असते. जान्हवीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत. जान्हवी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे अनेक फोटो जान्हवीने शेअर केले आहे. या फोटोंमध्ये जान्हवीने बिकीनी घातलेला दिसत आहे. जान्हवीचे हे फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जान्हवीच्या फोटोंनी सध्या इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.