'इंडियन आयडॉल 12' (Indian Idol 12) ची सेकंड रनर अप सायली कांबळे (Sayali Kamble) नुकतंच लग्नबंधनात (Wedding) अडकली आहे. तिच्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो तिच्या खास मित्रांनी आणि इंडियन आयडॉल स्पर्धकांनी शेअर केले होते. त्यांनतर आता सायली कांबळेने स्वतः आपल्या इन्स्टाग्रामवर लग्नानंतरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सायली आपल्या सासरच्या कुटुंबियांसोबत दिसून येत आहे. यावेळी सायली कांबळेने जांभळ्या रंगाची पैठणी परिधान केली आहे. नाकात नथ, हातात हिरवा चुडा केसात अंबाडा अशा मराठमोळ्या लुकमध्ये सायली फारच सुंदर दिसत आहे. तर पती धवलने पिवळ्या रंगाची ट्रॅडिशनल शेरवानी घातली आहे. सायली कांबळेने बॉयफ्रेंड धवल पाटीलसोबत लग्न केलं आहे.